बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलमध्ये खेळायची संधी सांगून अनेकांना फसवणूक; अनेक मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डापैकी एक आहे. भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि फायदेशीर स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखलं जाते. भारतातील क्रिकेट अनेकदा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आलं आहे. आताही क्रिकेट संघात सहभागी करतो असं सांगून लाखो रूपयांना गंडा घातल्याची महिती समोर येत आहे.

खेळाडूकडून पैसे घातल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले प्रशिक्षक कुलबीर रावत यांनी घोटाळ्याची कबूली दिली आहे. चौकशी दरम्यान रावत यांनी सिक्कीम क्रिकेट असोशिएशनचे निवडकर्ता विकास प्रधान यांचेही नाव घेतले आहे. रावत यांच्या या खुलास्यानंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी खूप मोठी नावं समोर येणार असल्याची शक्यता आहे.

गुरूग्राम पोलीस लवकरच प्रधान यांना चौकशीला बोलवणार आहेत. आशुतोष बोरा आणि कुलबीर रावत यांच्यातील व्हॅाट्सअॅप चॅटवरून या प्रकरणातील आणखीन धागेदोरे समोर येणार आहेत. अनेक राज्यातील क्रिकेट संघटनांमधील मोठी नावं या चॅटमध्ये आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट असोशिएशनचे निवडकर्ता अकरम खान, माहिम वर्मा यांचेही नाव या यादीत आहेत.

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अमन यांचही नाव आहे. आशुतोष बोरा आणि रावत यांच्यातील लाखो रूपयांचा व्यवहार सुद्धा पोलीस तपासून पहात आहेत. 4 सप्टेंबर रोजी पोलीसांनी क्रिकेटमधील खेळाडूंच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास लावला होता. हे प्रकरण आता अधिकंच मोठं होत असल्याचं पहायला मिळत आहे.

थो़डक्यात बातम्या 

‘आम्ही त्याला पकडलं नाही फक्त त्याच्यासोबत…’; मलिकांच्या आरोपांवर भानुशालींचं प्रत्युत्तर

मान्सून हंगाम संपला! ‘या’ भागातून अखेर परतीच्या प्रवासाला सुरूवात

येत्या 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’; ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून बंदची हाक

यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ दोन संशोधकांना जाहीर!

भाजपला शह देण्याची तयारी, पवारांच्या तीन पिढ्या मैदानात!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More