दारु पित असाल तर ही बातमी नक्की वाचा

नवी दिल्ली | भारतात मद्यप्रेमींची संख्या काही कमी नाही. तर अनेकदा दारु (Alcohol) पिण्याचे काही फायदे असतात म्हणून देखील दारु पितात. त्यामुळं दारु हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दारुच्या व्यसनामुऴं लोक त्यांचा पैसा आणि आरोग्य दोन्ही वाया घालवत असतात.

दारु ही आपल्या लिव्हरसाठी (Liver) घातक असते. फक्त लिव्हर नव्हे तर दारुचा परिणाम हृद्यावर(heart),पोटावर होतात. याशिवाय जास्त मद्यपान (drinking) केल्याचं परिणाम पाचनक्रियेवर देखील होतात. जास्त मद्यपानाने तुमची पाचनक्रिया बिघडू शकते. तसेच पोटाविषयीचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जास्त मद्यपानामुळं गॅस, सूज येणे, अतिसार आणि पोट भरल्यासारखं वाटू शकतं. मद्यपान आतड्यांना अन्न पचविण्यापासून रोखतं. पोषक आणि जीवनसत्त्वे प्रभावीपणे शोषून घेण्यापासून रोखू शकतं. यामुळं अल्सर (ulcer) आणि पोटात रक्तस्त्राव होऊ शकतो.

एकाचवेळी जास्त प्रमाणातच मद्यपान केल्यानं मेटाबाॅलिझम (Metabolism) प्रक्रिया होणं कठीण होतं. दारु जास्तवेळ शरीरात फिरते ज्यामुळं फॅटी लिव्हरची (Fatty liver) समस्या उद्भवू शकते. दारुचे परिणाम मेंदूवरदेखील होतात. तज्ज्ञांच्यामते अल्कोहोल मेंदूतील रसायनं कमी करतं. याचा परिणाम मध्यावर्ती मज्जासंस्थेवर (Nervous system) होतो.

यामुळं एकाग्रता, फोकस, मूड आणि रिफ्लेक्ससह बऱ्याच कार्यांवर परिणाम होतो. अनेकदा बोलण्यात अडचण देखील उद्भवते. दरम्यान, काहीदिवसांपूर्वी समोर आलेल्या एका सर्वक्षाणातून देशी भारतीयांना विदेशी दारुची आवड लागली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून विदेशी (foreign) मद्याची मागणी झपाट्याने वाढत आहे.

महत्त्वाची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More