नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरा बसला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत (Delhi) आणखी एका महिलेची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमन विहारमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने तिला पेटवून ठार (Murder) मारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तर पश्चिम दिल्लीतील अमन विहारमध्ये तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत होता. ड्रग्जवरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरला पेटवून ठार मारले.
ही महिला सहा वर्षांपासून आरोपी सोबत लिव्हइनमध्ये राहत होती. महिलेला दोन मुलं होती. पहिलं आपत्य हे पहिल्या पतीपासून तर दुसरं आपत्य आरोपी मोहितपासून.
दरम्यान, 10 फ्रेबुवारीला रात्री मोहित हा त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मोहितची लिव्ह-इन पार्टनर येथे पोहोचल्यावर तिने मोहितला ड्रग्ज घेताना पाहिले. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली.
प्रकरण इतकं वाढलं की आरोपीने त्याच्या लिव्ह इन पार्टनर महिलेला टर्पेन्टाइन ऑइल टाकून पेटवून दिल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-