”मी सुरक्षा मागितली नाही, मी एकटा वाघ आहे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं. त्याच पत्रामुळं आता वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याचसंबधी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं होतं.

या पत्रात त्यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना मारण्याचा कट केला जात असून तो शिंदे गटातील नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर टिका केली आहे.

यावर राऊतांनी पुन्हा एकदा सडेतो़ड उत्तर दिलं आहे. माझ्या पत्रात पाहिलं असेल तर तुम्हाला दिसून येईल मी सुरक्षा मागितली नाही. आम्ही लाचार नाही. सुरक्षा द्यावी म्हणून मी हे पत्र लिहलं नाही. मला सुरक्षा नाही दिली तरी चालेल. मी एकटा वाघ (Tiger) आहे. असे खूप वार आम्ही अंगावर झेलले आहेत, असं सडेतोड उत्तर राऊतांनी दिलं आहे.

आज अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awad) देखील धमक्या दिल्या जात आहेत. सरकार बदलल्यापासून सगळ्याच विरोधी पक्षाची सुुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. तुमच्या राज्यात काय चाललं आहे. तुमचं आमदार-खासदार कसं वागत आहेत हे सांगण्यासाठी मी हे पत्र लिहलं आहे, असं देखील राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊतांनी केलेल्या या आरोपामुळं अनेक लोक आक्रमक झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. राऊतांनी पत्रात दिल्याप्रमाणे त्यांची सुपारी राजा ठाकूर याला श्रीकांत शिंदेनी दिली असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळं आता त्याचीदेखील चौकशी होणार क? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या