Top News अकोला महाराष्ट्र

सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन

अकोला | युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळून फसवणूक करणारी टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं असा काही प्रकार तुमच्यासोबतही घडत असेल तर सावधान राहा आणि वेळीच पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी इथला रहिवासी 28 वर्षीय राहुल विजय पाटील यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पांघरी नवघरे इथल्या म्होरक्यासह पाच जणांची टोळी डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके रा. सातमैल (वाशिम रोड अकोला), संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे (राहणार आगीखेड ता . पातूर), हरसिंग ओंकार सोळंके (रा .चांदुर ता . अकोला) या तीन जणांसह एक महिला जळगाव खान्देश इथल्या तर दुसरी अकोला इथली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या