बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ही कोणती ‘शर्यत’? सांगलीत बैलगाडा शर्यतीत बैलांना बॅटरीने शाॅक देत मोठ्या काठीने जबर मारहाण

सांगली | महाराष्ट्रात गावांमध्ये होणाऱ्या जत्रांमध्ये बैलगाडा शर्यत संस्कृती ही शान मानली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जत्रांमध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना देखील आजही कित्येक गावात बैलगाडा शर्यत भरवली जाते. काही ठिकाणी या शर्यतीच्या तयारीसाठी बैलांना अमानुषपणे मारलं जातं, तर काही बैलांना बॅटऱ्यांचे शाॅक देखील दिले जातात. असाच एक प्रकार सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात घडला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातच्या अलकुडमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बैलगाडा शर्यत भरवण्यात आली. यावेळी या शर्यती दरम्यान बैलांना  बॅटरीचा शाॅक देण्यात आला. तर काठीने बैलाना मारहाण करून शर्यतीत पळवण्यात आलं. प्राणीमित्र अशोक लकडे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. तर जिल्हा पोलीस अधिक्षक निवेदन देऊन त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

मागील काही काळापासून सांगलीत बैलगाडा बेकायदेशीर शर्यतच्या स्पर्धा भरवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात मुक्या प्राण्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांमध्ये समावेश झाल्यापासून या बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती.

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी शर्यती पुन्हा सुरु झाल्यावर ग्रामीण भागात थंडावलेले आर्थिक चक्र देखील पुन्हा पूर्ववत होईल, असं  म्हटलं होतं. शर्यतीत वापरण्यात येणारे बैल ‘खिंडार’ जातीचे असल्याने त्यांचा उपयोग शर्यतीसाठीच होतो, असं खासदार अमोल कोल्हे संसदेत म्हटले होते. परंतू अशा अमानवी कृत्यामुळे एकेकाळी शान समजली जाणारी ही संस्कृती लवकरच विकोपाला येऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More