Top News धुळे महाराष्ट्र

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

धुळे | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा पहिला निकाल लागला असून त्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत.

अमरिश पटेल यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. अमरिश पटेलांना घवघवीत मते मिळाली आहेत.पटेल यांना 332, तर काँग्रेसच्या अभिजित पाटलांना यांना 98 मतं मिळाली आहेत.

यामधील 4 मते ही बाद झाली आहेत. त्यामुळे आता पटेल यांचा विजय निश्चित झाला असून फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

दरम्यान,महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवार म्हणाले…

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

‘माफी मागा अन्यथा तोंड काळ करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प

…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या