नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई | राणे कुटुंबियांचा आणि शिवसेनेचा वाद काही नवीन नाही. पण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगला आहे.

राणेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील एका महोत्सवात बोलताना राऊतांबदद्ल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संजय राऊत हे माझ्यामुळंच खासदार झाले आहेत, त्यांना खासदार होण्यासाठी मीच पैसा खर्च केला असं राणे म्हणाले होते.

आता राणेंच्या या वक्तव्याची दखल घेत राऊतांनी माझी बदनामी केली अस म्हणत, राणेंवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. तसेच राऊतांकडून राणेंना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहिती राऊतांचे वकिल सार्थक पी. शेट्टी यांनी दिली आहे.

राऊतांनी मानहानीचा दावा केल्यानंतर आणि कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेत यावर आता राणे काय प्रतिक्रिया देतील, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांबद्दल गौप्यस्फोट करण्याचा इशाराही दिला होता. राणे म्हणाले होते की, मी जर गौप्यस्फोट केला तर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे राऊतांना चप्पलीनं मारतील.

महत्त्वाच्या बातम्या-