मुख्यमंत्र्यांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप?, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर| वेगवेगळ्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणी गेल्या अनेक काळापासून अनेक नेते अडचणीत सापडले. कथित गैरव्यवहारांच्या आरोपांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse), संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सारख्या अनेक बड्या नेत्यांना अडचणीत पाडलंय. याच यादीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) नाव पण सामील झालंय.

नागपूरमधल्या कथित NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरणावरून आता एकनाथ शिंदेंची चांगलीच कोंडी झालीये. या प्रकरणावरून विरोधकांनी हल्लाबोल केला अन् एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ झाली.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नागपूरमधलं कथित NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरण चांगलंच लावून धरलंय. आव्हाडांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलेच आणि सोबत अनेक प्रश्नही उपस्थित केलेत.

पण हे NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय आहे ते आधी जाणून घेऊ.

नागपूरच्या उमरेड रोडवरील जमीन NITने अर्थात नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टने झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपादित केली होती. त्यानंतर 2021 मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जमीन कमी किमतीत 16 लोकांना भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश दिले होते. पण एकनाथ शिंदेंच्या याच निर्देशामुळे NIT मोठा तोटा सोसावा लागला. हे सगळं माहिती अधिकारातून समोर आलं आणि विरोधकांनी यावरून चांगलीच टीका केली.

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना काही लोकं त्यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी ही जमीन 16 लोकांना दोन कोटी रुपयांमध्ये दिली होती. आज या जमीनीची किंमत जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक आहे. NITची ही जमीन 16 जणांना भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश तत्कालिन नगरविकास मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिले खरे. पण एकनाथ शिंदेंच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती. मग हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भूखंडाचे वाटप झालेच कसे? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

यावरूनच आव्हाडांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केले आणि काही प्रश्न पण उपस्थित केलेत. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरविकासमंत्री अशा प्रकारे जमीन वाटप करू शकतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये. यावरून स्पष्टपणे दिसतंय की एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केलाय, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. जितेंद्र आव्हाडांनी कथित गैरव्यवहार प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानं एकनाथ शिंदेंची मात्र कोंडी झालीये.

दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आता या कथित NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरणावरून त्यांची चांगलीच कोंडी झालीये. आता हे प्रकरण एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढवणारं ठरेल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-