बंगला, गाड्या, प्रॉपर्टी; शाहरूख खानची थक्क करणारी संपत्ती

मुंबई | बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. पठाणमधील ‘बेशरम रंग’ गाणं आणि त्यातील शाहरूख खान आणि दीपिका पादुकोनचे (Deepike Padukon) कपडे, वल्गर डान्स मुव्ह्स अशा अनेक कारणांमुळे पठाण सिनेमाच ट्रोल होतोय. सध्या सगळीकडेच बॉयकॉट पठाण ट्रेंड होत असताना शाहरूख खानने या सिनेमासाठी घेतलेल्या भल्यामोठ्या मानधनाचीपण चांगलीच चर्चा होतीये.

पठाणसाठी दीपिका पादुकोनने 15 कोटी रूपये मानधन आकारलं तर शाहरूख खानने त्यापेक्षा पण कितीतरी जास्त मानधन घेतल्याची सध्या चर्चा आहे. एका चित्रपटासाठीच जर शाहरूख खान एवढं मानधन घेत असेल तर त्याची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. तर पठाण सिनेमा आणि त्याच्या वादविवादामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या किंग खानची कमाई, बंगले, गाड्या आणि एकंदर संपत्तीबद्दल जाणून घेऊ.

कोणे एकेकाळी टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात केलेला शाहरूख खान बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करेल असं कदाचित खूप कमी जणांना वाटलं असेल. ‘सर्कस’ या टीव्ही सिरियलमधून करियरची सुरूवात केल्यानंतर शाहरूख खानने फक्त हिरोच नाही पण व्हिलनच्या भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या.

बघता बघता शाहरूख खान हा बॉलिवूडचा किंग खान आणि रोमान्सचा बादशाह झाला. शाहरूख खानने अभिनयातून प्रसिद्धी आणि आदर मिळवलाच पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यानं संपत्तीही कमावली आहे.

सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत अर्थातच शाहरूख खानचा नंबरय. एखाद्या महालाला लाजवेल अशा किंग खानच्या ‘मन्नत’ बंगल्याची नेहमीच चर्चा असते. शाहरूख खानची मुंबईच्या वांद्रेत असलेली ही 6 मजली मन्नत इमारतच 200 कोटींची असल्याचं सांगितलं जातं. शाहरूख खानचं मन्नत निवासस्थान पाहण्यासाठी चाहते दूर-दूरवरून पोहोचतात. मन्नतबाहेर लावण्यात आलेल्या नव्या डायमंड नेमप्लेटचे फोटोज पण काही दिवसांपूर्वी चांगलेच व्हायरल झाले होते.

मन्नत निवासस्थानाव्यतिरिक्त शाहरूखचा दुबई यूएईच्या पाम जुमेराहमध्ये सिग्नेचर व्हिला आहे. यासोबतच मुंबई, दुबई, लंडन आणि जगभरातल्या इतर अनेक ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये त्यांची गुंतवणूक पण आहे.

कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक असलेला किंग खान महागड्या गाड्यांचा पण शौकीनय. त्याच्या कार कलेक्शनमध्ये बुगाटी वेरॉन ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. याच कारची किंमत 12 कोटींच्या घरात आहे. याशिवाय शाहरुखच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू सीरिजचे दोन मॉडेल्स. मित्सुबिशी पजेरो, ऑडी A6, लँड क्रूझर आणि रोल्स रॉयस ड्रॉपहेड कूप सोबत अशा अनेक कोटयवधींच्या गाड्या आहेत.

शाहरुख खान सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयांपैकी एक आहे. फक्त सिनेमेच नाही पण शाहरुख खान जगातल्या मोठ मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करून बक्कळ पैसा कमावतो. एका सिनेमासाठी 80 कोटी घेणाऱ्या शाहरूख खानने पठाणसाठी 20 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. शाहरूख खानची एका महिन्याचीच कमाई 12 कोटींपेक्षा जास्त आहे. 22 कोटींची ब्रँड एंडोर्समेंट फी घेणाऱ्या शाहरूखची वार्षिक कमाईच 240 कोटींपेक्षा पण जास्त असल्याचं म्हटलं जातं.

दरम्यान, शाहरुख खानच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती ही 5580 कोटी रूपये आहे. संपत्ती असो किंवा अभिनय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असलेला किंग खान आता त्याच्या पठाण या सिनेमाच्या वादामुळे चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-