मुंबई | राणा दांपत्याच्या भेटीला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाल्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे.
भाजप नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
‘राष्ट्रपती राजवट लावा… लै मजा येईल..’, असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राज्यात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राणा दांपत्याने त्यांचं आंदोलन मागे घेतल्यावर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्याच्या भेटीला गेलेल्या सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यात जितेंद्र आव्हाडांनीही राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रपती राजवट लावा …
लै मजा येईल ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
थोडक्यात बातम्या-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पंतप्रधान मोदींनी घेतला महत्त्वाचा निर्णय
“बाजारात नवी ऑफर, ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा”
“…आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो”
“…त्यामुळेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला”
मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली
Comments are closed.