बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसार थाटल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच ‘या’ अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?

मुंबई | टेलिव्हिजनवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करून जातात. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या मालिकांमधील एक मालिका म्हणजे स्टार प्लसवर प्रदर्शित होणारी ‘पांड्या स्टोर’. पांड्या स्टोर या मालिकेतील प्रत्येकच पात्राने लाखो प्रेक्षकांना भुरळ घातली. अभिनेता अक्षय खरोडिया याने देखील मालिकेत उत्तम अभिनय करत दर्शकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अक्षय खरोडिया 19 जून 2021 रोजी त्याची गर्लफ्रेंड दिव्या पुनेठासोबत लग्नबंधनात अडकला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा लग्नाला केवळ 10 लोकांनी हजेरी लावली होती. परंतु, नुकतीच अक्षयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट पाहून सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. या पोस्टमुळे अक्षय आणि दिव्या या दोघांच्या नात्यात एक महिन्यातच फूट पडली असल्याचं बोललं जात आहे.

अक्षयने या पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असं म्हटलं आहे. तसेच पोस्टसोबत हॅशटॅगचा वापर करत ‘हर्टब्रोकन’ असं सुद्धा त्यानं म्हटलं आहे. या पोस्टवरुन लग्नानंतर अवघ्या एका महिनाभरातच त्या दोघांच्या नात्यात फूट तर पडली नाही ना, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर चाललेल्या या चर्चांवर अक्षयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्याने सोशल मीडियावर दिव्यासोबतचे फोटो शेअर करणे बंद केल्याचं निदर्शनास येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More