बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कन्हैया कुमारला राष्ट्रगीताचा विसर; शेवटच्या दोन ओळीत घातला घोळ

पाटणा | जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमारच्या नेतृत्वात पाटणामध्ये संविधान बचाओ नागरिकता बचाओ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही सभा अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरली.

सभेच्या शेवटी भाषण देण्यास उठलेल्या कन्हैया कुमारने उत्साहाच्या भरात राष्ट्रगीताने आपल्या भाषणाची सुरूवात केली. मात्र स्वत: कन्हैया कुमारच राष्ट्रगीतातील शेवटच्या ओळी विसरला. ही बाब चर्चेचा विषय ठरली.

कन्हैया कुमारने सभेला उपस्थित असलेल्या लोकांना उभे राहून राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केलं. त्यानंतर राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. मात्र राष्ट्रगीतातील शेवटच्या दोन ओळींमध्ये जन गण मंगलदायक जय है ऐवजी कन्हैयाने जन गण मण गायलं.

दरम्यान, कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सहा-सात वर्षांच्या मुलाने देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चार ओळी ऐकवल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली.

ट्रेंडिंग बातम्या- 

नाणार प्रकल्पाला स्थानिक राष्ट्रवादीचा पाठिंबा; शिवसेनेला धक्का

न्यायालयासही ‘सत्य’ बोलण्याची शिक्षा मिळू लागली आहे काय?; शिवसेनेची टीका

महत्वाच्या बातम्या- 

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी; छगन भुजबळांची मागणी

इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही- नितीन गडकरी

देशात जे काही होत आहे त्याला आपणच जबाबदार- मोहन भागवत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More