महाराष्ट्र मुंबई

कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

मुंबई | मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील पुन्हा विजयी झाले आहेत, मात्र या विजयाच्या माध्यमातून त्यांनी काही हिशेब चुकते केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

कपिल पाटील अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी विधान परिषदेत भाजपच्या मंत्र्यांना पळता भुई थोडी केली होती. चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी एकदा केला होता तर विनोद तावडे यांच्यासोबत त्यांची अनेकदा खडाजंगी झाली होती. 

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले, मात्र अभ्यासू ओळख आणि अफाट जनसंपर्क यांच्या जोरावर कपिल पाटील यांनी विजय खेचून आणला. 

महत्त्वाच्या बातम्या –

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

-घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पहा व्हीडिओ

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या