बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं- किरीट सोमय्या

मुंबई | ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करणे हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असं आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे-वायकर परिवाराच्या जमीन खरेदी व्यवहारावर लक्ष वेधत अन्वय नाईक आणि ठाकरे परिवाराचे काय आर्थिक संबंध आहेत? असा सवाल केला आहे.

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणूनच हा प्रश्न करत आहे. सामान्य व्यक्ती असता तर विचारलंही नसतं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? त्यांचा जमिनीत गुंतवणूक करण्याचा व्यवसाय आहे का?, असे प्रश्न विचारले आहेत.

ठाकरे परिवाराचा जमिनी व्यवहारात संबंध कसा आला? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर कुटुंब जमिनींचे व्यवहार का करत आहेत? हा प्रश्न मला पडलेला आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणून एकत्र आला असाल तर तसं जाहीर करावं, असं आवाहन सोमय्या यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सारखं सांगावं लागतंय- जयंत पाटील

… ‘या’साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार- नारायण राणे

राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता!

दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More