बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरावतीच्या वर्धा नदीत मोठी दुर्घटना; बोट उलटून 11 जण बुडाल्याची भीती

अमरावती | गेल्या काही दिवसापासून राज्यभरात मुसळधार पडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणे भरली असून काही नद्यांना पूर देखील आला आहे. त्यातच आता अमरावतीत मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावतीमधील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे प्रवासांनी भरलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातात तब्बल 11 जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील तीन जणांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर 8 जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

वर्धा नदीकाठी असलेलं झुंज नावाचं मोठं पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी गाडेगावमधील एक कुटूंब दशक्रिया विधीससाठी आले होते. मात्र काळाने घात केला आणि बोटीतून महादेव मंदिराकडे  जात असताना हे बोट पलटली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. घटनास्थळावर पोलीस प्रशासन तसेच इतर स्थानिक मदत करणारे लोक देखील उपस्थित आहे. त्यांच्या सहाय्याने मदत कार्य सुरू असल्याचं स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

करुणा शर्मांना मोठा झटका, कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?, शास्त्रज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

…तेव्हा मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर आली होती- नितीन गडकरी

प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या?, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

बिहारच्या राजकारणात खळबळ! ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More