मुंबई |अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्याबाबतीतदेखील चर्चेत असते. अलीकडे ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कित्येक दिवस तिचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा होती. याचबाबतील स्वत: मानसीनं तिचं मत व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीत तिनं तिच्या घटस्फोटाचं (Divorce) नेमकं कारण सांगितलं आहे. तसेच ती घटस्फोट घेत असल्याची चर्चा खरी असून तिनं घटस्फोटासाठी अर्ज केलाअसल्याचं सांगितलं आहे. नात्यात समजूतदारपणा नसेल तर त्या नात्यातून बाहेर पडणं गरजेच आहे. असा सल्लादेखील तिनं दिला आहे.
माझ नेमकं काय चुकलं हे मला सध्या सांगण कठीण आहे. सगळ्या गोष्टी खूप घाईत झाल्या. काही लोक पैसा आणि प्रसिद्धीसाठी (for publicity) सगळं काही करतात. एक स्त्री म्हणून माझी देखील काही मतं आहेत. एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला जाऊ शकते याचा मी विचारदेखील करु शकत नाही आहे. असं तिनं मुलाखतीत म्हणलं आहे.
ती तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी नसल्याचं तिनं सांगितलं. दरम्यान, मानसीनं 2021 मध्ये बाॅक्सर प्रदिप खरे (Boxer Pradeep Khare) याच्यासोबत थाटामाटात लग्न केलं होतं. काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. तिच्या या घटस्फोटाच्या निर्णयानं मानसीच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- राखी सावंतचं दुसरं लग्नही धोक्यात! धक्कादायक कारण आलं समोर
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; काय आहे नेमकं प्रकरण?
- ‘या’ कंपनीची 1.21 कोटींची कार फक्त 14 लाखाला! ग्राहकांची बुकींगसाठी धावपळ
- थायराॅईडची ‘ही’ लक्षण तुम्हाला नाहीत ना? आजच खात्री करुन घ्या
- उत्तम मराठी बोलता येतं? ही नोकरी तुमचीच!