मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारकडे सादर; नेमकं काय आहे अहवालात?

मुंबई | राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारकडे सादर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव ए के जैन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्यासह सदस्यांनी हा अहवाल सादर केला.  हा अहवाल तब्बल 20 हजार पानांचा असून या अहवालात नेमकं काय आहे?, याबाबत आता सर्वांना उत्सुकता आहे.

मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाबाबतीत काेणत्या शिफारशी या अहवालात करण्यात आलेल्या आहेत. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, हा अहवाल येत्या 19 नोव्हेंबरला हायकोर्टात सादर केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळणार!

-भाजपसाठी धोक्याची घंटा; लोकसभेतील जादूई आकडा गमावला