मुंबई | कर्नाटकातील हिजाब वादावरून (Hijab Controversy) देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटकात काही मुस्लिम मुलींनी शाळेत हिजाब परिधान केल्यावरून या वादाला तोंड फुटलं. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला असला तरी अजूनही अनेकदा या मुद्द्यावरून वादावादी झालेली पाहायला मिळत आहे.
यंदाची मिस यूनिवर्स हरनाज कौर संधू (Miss Universe Harnaz Kaur Sandhu) हीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिला हिजाब वादावर तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर हरनाजला केवळ तिच्या करिअरबद्दल प्रश्न विचारावेत, राजकीय प्रश्न विचारू नयेत, असं हरनाजच्या टीमच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र, रिपोर्टरने हरनाजला परत याच वादावरून प्रश्न विचारला.
तुम्ही लोकं फक्त मुलींनाच का टार्गेट करता, जसे तुम्ही अजूनही मला टार्गेट करत आहात, असा प्रश्न हरनाजने रिपोर्टरला विचारला. तिला जसं जगायचं आहे तसं तिला जगू द्या. तिला तिचं ध्येय गाठू द्या. तिला उडू द्या, ते तिचे पंख आहेत, तुम्ही कापू नका. कापायचे असतील तर स्वत:चे पंख कापा, अशी प्रतिक्रिया हरनाजने दिली आहे.
दरम्यान, हरनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यावरून अनेकांनी हरनाजला ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. तिचं उत्तर ऐकुन हा वाद नक्की काय आहे, हे तरी तिला माहिती का?, असा सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे.
Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu’s Powerful Answer On Hijab Row Questions#MissUniverse2021 #HarnaazKaurSandhu #Hijab #HijabControversy #HijabRow #HijabMovement #HijabisOurRight pic.twitter.com/kr5y72bFSV
— Safa 🇮🇳 (@safaperaje) March 26, 2022
थोडक्यात बातम्या-
“25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे”
मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”
कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार
“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडित बाहेर गेले”
Comments are closed.