औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी जाहीर कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विक्रम काळेंनी ही मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
सतीश चव्हाण किंवा मला मंत्रिपद देण्यात यावे. जर दोघांना मंत्रिपद देण्यात अडचण असेल तर सीनिअर म्हणून सतीश चव्हाणांना संधी देण्याची मागणी विक्रम काळे यांनी केली आहे.
विक्रम काळेंनी यावेळी बोलताना मंत्रिपदाबाबत आणखी एक फॉर्म्युला मांडला. दोघांना मंत्रिपद द्यायचं असेल तर अडीच वर्षे सतीश चव्हाण यांना आणि अडिच वर्ष मला संधी द्यावी, असं विक्रम काळे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”
“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”
शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन!
पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!
“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”