बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

मुंबई | बॉलिवूडची लोकप्रिय कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन झालं आहे. सहर यांच्या अचानक जाण्यामुळं बॉलिवूडकरांनी दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केला आहे.

सहरच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. यामुळे तिला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यानं तिची प्राणज्योत मालवली.

सहरनं तिच्या करिअरमध्ये द बेस्ट एग्जॉटिक मेरीगोल्ड होटल, मिलियन डॉलर आर्म, शकुंतला देवी, दुर्गामती-द मिथ, मान्सून शूटआऊट आणि लंच बॉक्स सारख्या सिनेमात शिवाय अनेक वेबसीरिजमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं होतं.

दरम्यान, सहर अली लतीफ यांच्या निधनावर राजकुमार राव, हुमा कुरैशी, अनुराग कश्यप, शिबानी दांडेकर, रोहित सराफ, मिलाली पालकर, निमरत कौर, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता, मानवी गागरू आणि मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झालं सोनं; वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी अतिवृष्टीचा इशारा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘हे’ आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More