शिवराज सिंग पास होणार; मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार!

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊच्या सर्व्हेत तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत. यापैकी 142 जागा जिंकण्यात भाजपला यश येईल तर काँग्रेसच्या 20 जागा वाढण्याची शक्यता असून त्यांना 77 जागा मिळतील, असं हा सर्व्हे सांगतो.

230 मतदारसंघांतील 14 हजार 569 लोकांशी संवाद साधून हा सर्व्हे करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी तब्बल 61 टक्के लोकांनी शिवराज यांना पसंती दर्शवली आहे. तर फक्त 17 टक्के लोकांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. 5 टक्के लोकांनी दिग्विजय सिंह यांना तर 6 टक्के लोकांनी कमलनाथ यांना पसंती दिली आहे.

कोणत्या राज्यात काय होणार?-

-राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कुणाची सत्ता?

-मध्य प्रदेशप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजप सत्ता राखणार!

-राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका; काँग्रेसची सत्ता येणार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या