गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

मुंबई | गडकरींपेक्षा 1 मत तुम्ही जास्त घेऊन दाखवा, असं चॅलेंज भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते आणि नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना दिलं आहे. ते आव्हान पटोले यांनी स्वीकारलं आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून मी नितीन गडकरींचा 5 लाखांहून अधिक मताने पराभव करणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आपण 23 तारखेला भेटू… मी तुमच्याशी शर्यत लावतो. गडकरींचा पराभव होणार नाही, असं महाजनांनी म्हटलंय.

गडकरींना मी हरवून दाखवणार म्हणजे दाखवणार, अशी भीष्म प्रतिज्ञाच पटोले यांनी केली आहे.

नाना पटोलेंनी मंत्रिपद मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला आणि नाही मिळालं त्यामुळेच त्यांनी भाजप सोडली, असा आरोप महाजनांनी केला. त्यावर तुमच्या भरवशावर नव्हता, तुम्ही जनतेशी विश्वासघात केला असा पलटवार पटोलेंनी महाजनांवर केला.

महत्वाच्या बातम्या

-हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

-नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

-बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्र

Google+ Linkedin