बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”

मुंबई | कोरोना संकटामध्ये काॅंग्रेस पक्षानं मुंबईमधील युपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा असं काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला होता. यावरुन काॅंग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

आज काॅंग्रसेच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं. काॅंग्रेसच्या आंदोलनानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट काॅंग्रेसने संपूर्ण देशाची मागणी मागितली पाहिजे, हे नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत. यांना कितीही नौटंकी करू देत. त्याचा काही परिणाम होत नाही, असं म्हणत देवेंद फडणवीस यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजप सदस्य बाक वाजवत होते, असा आरोप करत याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा नानांनी दिला होता.

थोडक्यात बातम्या – 

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मोदींच्या काळात ‘इतक्या’ कोटी रूपयांची बँक फसवणूक, राहुल गांधीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“युपी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…”

“अति बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले, हिंमत असेल तर…”

पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More