बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये चलबिचल असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा तर केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. त्यात आता शिवसेनेने नाना पटोले यांच्या वक्तव्यांचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेतला आहे.

नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्यानं राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केलं. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असं नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही, असं शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटलं आहे.

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळालं असेल तर ते बरंच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकलं असं वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार स्वबळास उत्तरं दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही, असं पवार यांनी जाहीरपणे सांगितलं ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे. येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे व हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे. आज नानांचा फोन सध्या कोण चोरून ऐकत आहेत? किंवा नानांवर नक्की कोण पाळत ठेवत आहेत?, असा सवाल देखील अग्रलेखातून मांडण्यात आला आहे. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ!, असं तोंडसुखही शिवसेनेने घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या-

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

महत्वाची बातमी! पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार रशियन कोरोना रस

खुशखबर! सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल दहा हजार रुपयांनी उतरले

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More