देश

नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | पंतप्रधान होणारी व्यक्ती ही देशाची पंतप्रधान असते ती कोणत्या पक्षाची नसते, नरेंद्र मोदी ज्याप्रकारे विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांना वागणूक देतात त्यावरून ते भारताचे नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात, असं वाटतं असा हल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चढवला आहे.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्लीतील आंध्र भवन येथे उपोषणाला बसले असून अरविंद केजरीवालांनी त्यांना पाठींबा दिला आहे.

नरेंद्र मोदींनी तिरूपती मंदिरात आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते त्यांनी पूर्ण केलं नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदी खोटी आश्वासनं देण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत, असं देखील केजरीवाल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

देशसेवेसाठी प्रियांकाला देशाच्या हवाली केलंय…. राॅबर्ट वाड्रांनी लिहिली भावुक पोस्ट

प्रियांका गांधींच्या एंन्ट्रीमुळं सपा-बसपानं घेतला मोठा निर्णय??

मी अपयशी, तर मग महाभेसळीची गरज काय?- नरेंद्र मोदी

काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष… “आ गई राहुल संग प्रियांका गांधी….!” पाहा व्हीडिओ

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज कार्यकर्त्यांशी साधतायत कृष्णकुंजवर ‘मनसे’ संवाद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या