बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला, गंभीर आरोप करत म्हणाले…

मुंबई | संपुर्ण राज्यभरात सध्या एनसीबीकडून करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणातील कारवाईचीच चर्चा आहे. त्यातच या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विभागीय संचालकांवरच आरोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत.

निरज गुंडे हा भाजपचा दलाल माझ्यावर आरोप करतोय, असं म्हणत या निरज गुंडेच्या घरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचं सारखं येणं जाणं असायचं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या दालनातही त्याला थेट प्रवेश मिळायचा. असं स्पष्ट करत तो आता तासनतास समीर वानखेडेंच्या कार्यालयात का बसतो?, यांचं कारण सांगत त्यांनी मोहीत कंबोज, काशिफ खान आणि कार्डेलिया क्रुझ प्रकरण यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

हे प्रकरण एकमेकांशी कसं संबंधित आहे याबाबत मी लवकरच खुलासा करून ही बाब सर्वांसमोर आणणार असल्याचं म्हणत त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यात तोंड दाखवायची लायकी उरणार नाही, असा घणाघाती हल्ला नवाब मलिकांनी निरज गुंडे आणि देवेंद्र फडणवीसांना उद्देशुन केला आहे.

‘निरज गुंडे चोर आहे आणि तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे, याचबरोबर मी विविध विषयांवर बोलत असल्याने मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न फडणवीसांनी केला’, असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. तसेच कुर्ल्यातील माझ्या मुलाने घेतलेल्या जागेवर फडणवीसांनी तेव्हा जाणीवपुर्वक आरक्षण टाकल्याचा थेट आरोप त्यांनी केला. त्यामुळे दिवाळीनंतर आता मलिक काय उघडकीस आणणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

एमआयएममध्ये फूट?, ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ

“पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…”

तालिबान्यांचा क्रुरपणा! लग्नात संगीत लावल्यामुळे 13 अफगाण लोकांची हत्या

‘ते’ आंदोलन भोवलं; पडळकरांसह 70 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More