बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊनच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. काल टास्क फोर्सच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊनचे संकेत दिले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा याला विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात कोरोना गरजेचा नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे या माध्यमातुन महाविकास आघाडी सरकारमधील कुरबूर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. विरोेधी पक्षानंतर आता सत्तेत असणाऱ्या पक्षानं पहिल्यांदाच अशी भुमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपने या पुर्वी लाॅकडाऊनला कडाडुन विरोध केल्यानंतर आता सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीनेही विरोध करत महाराष्ट्रात लाॅकडाऊन गरजेचा नसुन आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं नवाब मलिक यांनी बोलुन दाखवलं आहे. कोरोना बरा होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच नागरिकांचा निष्काळजीपणा आणि नियम न पाळण्यामुळे धोरणामुळे लॉकडाऊन गरजेचा असल्याचं दिसून येत आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. तसेच ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे 15 दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची पूर्ण साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याचंही त्यांनी यावेळी बोलुन दाखवलं.

महाराष्ट्रात मर्यादित स्वरूपात लाॅकडाऊन लावण्यात यावा तसेच त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांनी तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विरोधाला मुख्यमंत्री कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

पुण्यासाठी आजचा दिवस जरा बरा, एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद

भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे

शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More