महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक संजय राऊतांना म्हणतात, ‘धीरे धीरे प्यार को बढाना है’

मुंबई | धीरे धीरे प्यार को बढाना है, हद से गुजर जाना है, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी हे ट्वीट करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टॅग केलं आहे. त्यामुळे या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर या तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी आपल्या मित्रपक्षातल्या नेत्यांशी असलेल्या मैत्रीचे दाखले देण्यास सुरूवात केली आहे.

संजय राऊत यांची गेल्या दिवसांपासून ट्वीटरवर ट्वीटची मालिका सुरू आहे. त्यांच्या या ट्वीटच्या मालिकेला अनेकांचा प्रतिसाद मिळतोय. नवाब मलिक यांनीही ट्वीट करत आपल्या वैयक्तिक मैत्रीला आणि पक्षीय मैत्रीला दुजोरा दिला आहे. शिवाय मैत्री दृढ करायची आहे, असंही राऊतांना सांगितलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या या ट्वीटला संजय राऊत काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे. 

नवाब मलिक यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या