मुंबई | राम मंदिरासाठीच्या वर्गणीचे काम येत्या संक्रातीपासून सुरू होणार आहे. 12 कोटी कुटुंबांसोबत स्वयंसेवक संपर्क साधणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं होतं. यावर शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचं आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’, असंही राणेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना शाखा उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, निलेश राणेंच्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’. https://t.co/gpka5hVjRM pic.twitter.com/O1jRWPH7fv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 30, 2020
थोडक्यात बातम्या-
‘मी ड्रग्जच्या आहारी गेले होते’; डीअर एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार?
‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र
पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!
‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक
राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह