महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्र्यांनी फक्त भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही”

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे मदतनिधी जाहीर का करत नाही, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे. भावनिक भाषण करत असताना लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना तळहातावर पोट असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना किमान वेतन चालू ठेवा अशी विनंती केली आहे. अमेरिकेतल्या ट्रम्प यांच्यापासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपनीवाल्यांना केलं आहे.

दरम्यान, एक नम्र विनंती….सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावं अशी विनंती राणे यांनी कोकणवासी असलेल्या मुंबईकरांना केली होती.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लगेच सेलिब्रेशन सुरु करु नका; नरेंद्र मोदींनी जनतेला खडसावलं

कौतुकास्पद! कोरोनावर मात करण्यासाठी आनंद महिंद्रांनी घेतले हे निर्णय

महत्वाच्या बातम्या-

लगेच सेलिब्रेशन सुरु करु नका; नरेंद्र मोदींनी जनतेला खडसावलं

‘हे अपेक्षित नाही…’, रस्त्यावर उतरुन घंटानाद करणाऱ्यांवर अजित पवार संतापले

कोरोना नियंत्रणासाठी न्यायालयांचा पुढाकार; न्यायाधीशांनी दिला महिन्याचा पगार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या