केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर चक्कर येऊन कोसळले

संग्रहीत फोटो

अहमदनगर | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले. राहुरी इथं ही घटना घडली आहे.

नितीन गडकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. त्यावेळी कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

नितीन गडकरी यांच्याकडे सध्या केंद्रीय दळणवळण मंत्रिपदाचा कार्यभार आहेत. कामाच्या बाबतीत त्यांचा हात कुणीच धरु शकत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. 

सततच्या कामामुळे ताण आला असावा आणि त्यातून त्यांना चक्कर आली असावी, असा अंदाज आहे. 

महत्वाच्या बातम्या-

मोदीजी माझ्याही लग्नाला या; राखीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण

कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण