Top News

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

मुंबई | वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

वीज वापरणारे हे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला वीज बाहेरुन विकत घ्यावी लागते. विविध शुल्कही द्यावी लागतात. बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत. तसंच पूर्ण बिल एकदम भरणाऱ्यांना सवलतही दिली आहे, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. 69 टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

दरम्यान, महावितरण 69 हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही, असंही नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”

मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे

‘बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा’; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

“गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही- पंकजा मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या