बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोकळ शब्दांची नाही तर, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार ते अतीमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी होत पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनामुळं सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्र्यपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी आणि हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असं फडणवीस यांनी ट्विट करत म्हणाले आहेत.

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढं लिहीतात की, आज शेतकरी असो वा समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.

दरम्यान, राज्यासह मराठवाड्यात पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. लाखो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. तर 436 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मराठवाड्याचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! 436 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी दौरा

“लायकीत राहा अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More