Top News महाराष्ट्र मुंबई

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.  राज ठाकरेंना 5 जानेवारील कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता ॲमेझाॅन आणि मनसे वाद चांगलाच चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर  मनसे नेते अखिल चित्रे यांनी ॲमेझाॅनला इशारा दिला आहे.

फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

19 तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं, असंही चित्रे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे, असंही एबीपी माझाशी बोलताना चित्रे यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका

‘राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी’; आशिष शेलारांचा शेट्टींना टोला

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या