बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले…

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या भावात देखील वाढ व्हायला सुरूवात झाली होती. ही वाढ आजपर्यंत सुरूच आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव अलिकडे गगनाला टेकले आहेत. अशातच आज हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पुरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी इंधनांच्या वाढत्या दराबद्दल बोलताना पुरी म्हणाले की, अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच मी या विषयावर भाष्य करेल. मला थोडा वेळ द्या मला या विषयांवर माहिती मिळवणे आवश्यक आहे. मी नुकतंच या इमारतीत पाऊल टाकले आहे. मी लगेचच इंधनांच्या किंमतींवर बोलणं चुकीचं असेल.

दरम्यान, मे महिन्यापासून आतापर्यंत एकूण ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 34 वेळा वाढ झाली आहे. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली असल्याचं दिसत आहे.

जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त देशात पेट्रोलची किंमत शंभरीपार गेली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रती लीटर झाली आहे. तर मुंबईत 106.59 रुपये प्रति लिटर झाली आहे. यासोबतंच दिल्लीत डिझेलची किंमत वाढून 89.62 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 97.18 रुपये प्रति लिटर झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

बाॅलिवूडवर पून्हा शोककळा! हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचं निधन

‘शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते’; शिवसेनेच्या बड्या नेत्याची गर्जना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More