‘पद्मावती’च्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाचा आणखी एक धक्का!

मुंबई | पद्मावती सिनेमावरुन वाद सुरु असताना निर्मात्यांनी सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची मागणी केली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने ही मागणी धुडकावून लावली आहे. 

नियमांच्या चौकटीत राहूनच ‘पद्मावती’ला प्रमाणपत्र देण्यात येईल. आमच्याकडे ज्या क्रमाने अर्ज आलेत ते त्याच क्रमाने पडताळले जातील, असं सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केलंय. 

सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे सिनेमा लवकर सेन्सॉर होऊन हाती पडण्याच्या निर्मात्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाच्या तारखेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.