मनोरंजन

डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर बायोपिक; हा अभिनेता साकारणार कलामांची भूमिका

मुंबई | भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर आधारित बायोपिक साकारण्यात येत आहे. या चित्रपटात अब्दुल कलाम यांच्या भूमिकेत अभिनेते परेश रावल दिसणार आहेत. स्वतः परेश रावल यांनी ट्वीट करत  ही माहिती दिली आहे.

माझ्या मते कलाम हे संत होते. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं परेश रावल म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

एम. एस. धोनी, मेरी काॅम, संजय दत्त, यांच्या बायोपिकनंतर आणखी एक नाव या बायोपिकच्या यादित सामील होताना दिसतंय. त्याचबरोबर डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित  चित्रपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

परेश रावल यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने नायक, खलनायक, सहकारी अभिनेता अश्या प्रकारच्या भूमिका बजावत स्वतःची वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमधून वेगळं काहीतरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल का हे आता सिनेमा पाहिल्याावरच कळेल.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या