Top News देश

बिहारच्या विजयी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नेत्याला दिला मोठा इशारा

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या विजयी सभेत बिहारमधील मतदारांचे आभार मानले मात्र याच सभेत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक इशारा दिला आहे.

जे लोक लोकशाही पद्धतीने आपला सामना करु शकत नाही, जे आपल्याला आव्हान देऊ शकत नाहीत, असे काही लोक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा मार्ग निवडत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

देशाच्या काही भागात भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करुन ते आपला हेतू साध्य करतील. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला इशारा देण्याची गरज नाही, कारण इशारा देण्याचं काम जनताच करेल, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, निवडणुका येत जात असतात, जय-पराजय होत असतात. सत्तेवर कधी हा, कधी तो बसेल, मात्र त्यांचा हत्येचा खेळ लोकशाहीत कधीही यशस्वी होणार नाही. मृत्युचा खेळ खेळून कुणालाही मतं मिळणार नाहीत, असं मोदींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हा’ नेता बनणार बिहारचा मुख्यमंत्री?; नरेंद्र मोदींच्या भाषणात स्पष्ट संकेत

…तेव्हा आम्ही राज्यात पर्यायी सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“फायद्यासाठी बिहारमध्ये दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता”

अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

बिहार विधानसभा निवडणूकीत आमचं ‘ते’ ठरलेलं मिशन फत्ते झालं- चिराग पासवान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या