नवी दिल्ली | घोटाळेबाज नीरव मोदीचा मामा मेहुल चोकसीनं केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. त्याने भारताचं नागरिकत्व सोडलं आहे.
चोकसीनं अँटिग्वा उच्च आयोगात आपला पासपोर्ट जमा केला आहे. भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी त्याने १७७ अमेरिकन डॉलर्सचा डीडीही जमा केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. मी अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे त्यामुळे नियमानूसार भारतीय नागरिकत्व सोडत आहे, असं चोकसीनं म्हटलंय.
दरम्यान, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी हे साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. भारतीय नागरिकत्व सोडल्यानं त्याला भारतात आणण्याचा मार्ग आता अवघड झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आघाडीत ‘मनसे’चा समावेश होणार? राष्ट्रवादी मुंबईतील जागा मनसेला सोडणार?
–दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड म्हटल्यामुळे निहार पांड्या संतापला…
-पाटीदार नेता हार्दिक पटेलचं लवकरच शुभमंगल सावधान…
-करिना कपूर काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेच्या रिंगणात??
-“आता आपण वाद थांबवू आणि विकासावर बोलू..”
Comments are closed.