Top News क्राईम पुणे महाराष्ट्र राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणात आम्हाला येत आहेत ‘या’ अडचणी- पोलीस

Photo Credit- Instagram/Pooja Chavan

पुणे |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजत आहे. आत्महत्येला राजकीय वळण लागल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहे, मात्र या प्रकरणात नाव आलेल्या संजय राठोड यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आत्महत्या होऊन आठवडा होत आला तरी या प्रकरणात पोलिसांनी फक्त अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात कायदेशीर अडचणी येत असल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले आहे. या प्रकरणाबाबत पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे प्रकरण तडीस लागेपर्यंत प्रकरणाची चौकशी चालू राहिल असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. आत्महत्या नैराश्यातून झाली असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पुजाच्या डोक्याला जबर मार बसल्याने तिचा मृत्यु झाला आहे, असं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यु अशी नोंद केली आहे.

परंतु शवविच्छेदन अहवालाबद्दल मोजकीच माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. याशिवाय पूजाच्या लॅपटाॅप आणि मोबाईल विषयी कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. कथित ऑडिओ टेपच्या तपासाबाबत देखील माहिती पोलिसांनी मौन ठेवल्याने पोलिसांच्या तपासाविषयी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आत्महत्येचंं गुढं अजुनही कायम आहे.

दुसरीकडे भाजप या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत आहे. एका कथित मंत्र्याचं आणि कार्यकर्ताचं ऑडिओ टेप व्हायरल  झाल्यानंतर भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ कामधंदे सोडून ‘या’ गोष्टींमध्ये जातोय”

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

सैराटमध्ये लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजीलाही लागली लॉटरी!

Happy Birthday माँ… केक अब फीका लगता है!

चुकीला माफी नाही… मुंबई पोलिसांनी रणबीरची गाडी घेतली ताब्यात!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या