बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…’; पूजा चव्हाणची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल!

मुंबई | पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पूजाच्या शेवटच्या फेसबुक पोस्टवरून नवीनच विषयाला तोंड फुटलं आहे. पूजा चव्हाणने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मराठीतले दिग्गज कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात पोस्ट केली होती. मराठी साहित्यसृष्टीत भालचंद्र नेमाडे यांचं नाव आदराने घेतलं जातं.

मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांनी लिहीलेल्या कादंबरी या खूप प्रचलित आहेत. त्यांच्या बद्दल बोलताना पूजाने अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्या फेसबुक पोस्टमध्ये नेमाडे यांचा उल्लेख नालायक, मतिमंद आणि एकेरी भाषेत केला आहे. 18 जानेवारीला पूजाने शेवटची पोस्ट केली होती.

शेवटच्या फेसबूक पोस्टमध्ये तिने लिहलंय की, ‘8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजिनिअरिंग मध्ये एवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध करत आहे आणि हा नालायक खान्देशी लेखक “भालचंद्र नेमाडे” देशी दारू पिऊन त्यावर कादंबरी लिहीत आहे. अशा मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध’ अशी आक्षेपार्ह पोस्ट तिने केली होती.

साहित्यात एवढं मोठं नाव कमावलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे पोस्ट केल्याने तिच्यावर भरपूर टीकाही झाली पण, एखाद्याशी वैचारिक मतभेद असणं हे चूक नाही पण अशा भाषेत व्यक्त होणं ही काही बरोबर गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया माध्यमात उमटतांना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ

‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया

‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More