बापरे! पूर्वी 7 मुलं आणि आता एकाचवेळी पाच मुलांना दिला जन्म
नवी दिल्ली | लहान बाळ (Baby) जन्माला येणं म्हणजे त्या घरातील एक नवीन सणच असतो. आपल बाळ छान आरोग्यदायी आणि सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. आजही अनेकांना असं वाटतं की आपलं बाळ गोर आणि गुटगुटीत जन्माला यावं. त्यातही जर ट्विन्स होणार असतील तर त्यांची प्रचंड काळजी घेतली जाते.
एका स्त्रीसाठी बाळ (Baby) होणं हे सुखद आणि तितकंच त्रासदायकदेखील असतं, पण जर एखाद्या महिलेनं एकाचवेळी एक किंवा दोन ज्याला आपण ट्विन्स बेबी म्हणतो अशांना जन्म दिला तर अगदीच नाॅर्मल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र पोलंडमधील एका महिलेनं एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला आहे.
क्राको युनिव्हर्सिटीच्या (University of Krakow) रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय महिला जी पोलंडची (Poland) रहिवासी डाॅमिनिका क्लार्क आहे. तिनं 5 मुलांना जन्म दिला आहे. क्लार्कनं तिच्या गरोदरपणाच्या 28 व्या आठवड्यात 5 मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये तीन मुली आणि दोन मुलं आहेत. ही सर्व मुलं सिझेरियनच्या माध्यमातून महिलेच्या पोटी जन्माला आली आहेत.
विशेष बाब म्हणजे या महिलेले आधीच 7 मुलं आहेत. ही मुलं सध्या 10-12 वर्षाची आहेत. या 12 मुलांची आई क्लार्क (Clark) यांना अपेक्षेपेक्षा बर वाटत असल्याचं सांगितलं. तुम्हाला या जगात आनंदी राहायच असेलं आणि सकारात्मक (positive) रहायचं असेल तर तुम्हाला भरपूर मुले असावीत असंदेखील ती पुढं म्हणाली.
अचानक इतरी मुलं होण्याचं कारणाला मल्टिपल प्रेगनेंसी (Multiple pregnancy) म्हणलं जातं. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेनं 6 किंवा 7 मुलांना एकत्र जन्म दिला तर त्याला सेक्सटुप्लेट म्हणतात. अशा प्रेगनेंसीचं कारण म्हणजे फर्टिलाइज्ड अंड(Fertilized Egg) आणि दुसरं कारण म्हणजे एकापेक्षा जास्त एग्ज एकाच वेळी वेगवेगळ्या स्पर्मद्वारे फर्टिलाइज्ड (Fertilized by sperm) होणं. दरम्यान, क्लार्कची 5 ही मुलं सुखरुप आहेत. त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.