मुंबई | नुकतंच बिग बाॅस 16 चं (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले पार पडलं. या सीझनचा विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनची जोरदार चर्चा रंगली आहे. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेची(Shiv Thakare) मैत्री तर सगळ्यांनाच ठाऊक आहे.
स्टॅन(Stan) जिंकल्यानंतर शिवनं त्याला उचलून घेतले होते. तर स्टॅन म्हणाला होता की, शिवसाठी वाईट वाटतंय. यावरून दोघांची किती चांगली मैत्री आहे हे स्पष्ट होतं. बिग बाॅसमध्ये मैत्री कोणची, वाद कोणाचा याबाबत चर्चा सुरू असतानाच स्टॅनला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, बिग बाॅसमधील तुला कोणाच्या संपर्कात राहणं आवडणार नाही?.
यावर स्टॅननं उत्तर दिलं की, अर्चना गौतम. अर्चना गौतम (Archana Gautam) मिनिटा-मिनिटाला बदलते. अर्चना अशी आहे की जी मला कधीच समजली नाही. स्टॅनच्या बोलण्यावरून त्याला अर्चनाबद्दल राग आहे, असं वाटत आहे. मंडलिशिवाय मी इतर कोणाच्याही संपर्कात राहणार नाही, असंही स्टॅन म्हणाला आहे.
दरम्यान, बिग बाॅस सुरू असतानाच आपण सर्वांनी स्टॅन आणि अर्चना यांच्यातील वाद पाहिला आहे. एकवेळी तर स्टॅन अर्चनामुळं रडला होता.
महत्त्वाच्या बातम्या