‘व्हॅलेंटाईन डे’ च्या शुभमुहूर्तावर पुण्यातील ‘इतक्या’ जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | प्रेम (Love) म्हणजे एक हळुवार अलगद वाऱ्याची मंद झुळूक होय. प्रेमाचा आधार मिळाला की माणूस जग जिंकू शकतो. प्रेमाचा शेवट म्हणजे लग्न असं आपल्याकडं समजलं जातं. त्यात आज व्हॅलेंटाईन डे आहे, म्हणजेच प्रेमाचा दिवस. या दिवशी अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करतात.

काहीजण प्रेमात असतात आणि त्या प्रेमाला परिपूर्ण करण्यासाठी ते प्रेमयुगुल(love couple) लग्नाचा विचार करतं. लग्नामुळं ते दोघं एकत्र येतात. आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देतात. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न लग्नामुळं (by marriage) पूर्ण होतं.

हेच स्वप्न व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या शुभमुहुर्तावर पूर्ण करण्याचा निर्णय पुण्यातील जोडप्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं विवाह नोंदणी कार्यालयात (Marriage Registration Office) लग्न करणाऱ्या जोडप्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आजचा हा प्रेमाचा दिवस आयुष्यभरासाठी खास व्हावा या विचारानं विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील (PUne) विवाह केंद्रावर तब्बल 40 जोडप्यांनी आज लग्नगाठ बांधण्याचा विचार केला आहे. चाळीस जोडप्यांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत. या जोडप्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जोडप्यांनी हा निर्णय अचानक घेतल्यानं हा आकडा साठ-सत्तर जाईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे तरुणांच्या या निर्णयाला त्यांच्या पालकांनी देखील पाठिंबा दिला आहे. विवाह कार्यलयाबाहेर जोडप्यासह आई-वडीलदेखील(parents) उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या