…म्हणून हा माणूस 61 वर्ष झोपलाच नाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | झोप (Sleep) मानवाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गरज आहे. सात तास झोप झाल्याशिवाय तुम्हाला दिवसभर काम करण्यास उत्साह येत नाही. झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर त्याचे अनेक वाईट परिणाम होतात. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळं झोपेचं खोबरं झालं आहे.

आश्चर्य वाटेल पण जगात एक असादेखील व्यक्ती आहे जो 61 वर्ष झोपलाच नाही. हा व्यक्ती व्हिएतनामध्ये (Vietnam) राहतो. त्याचं नाव थाय एनजोक (Thai Njok) असं असून ते 80 वर्षाचे आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की 61 वर्षांपासून झोपलेले नाहीत असा दावा केला आहे. त्याच्या या कारणामुळे त्यांना Sleepless Man म्हणून देखील ओळखलं जातं.

झोप ने येण्याची अनेक कारणं असतात. या व्यक्तीचं कारणदेखील काही वेगळं आहे. लहानपणी त्यांना अचानक एका रात्री ताप (Fever) आला होता. त्यानंतर ते आजतागायत झोपले नाही. या गोष्टीला आता 61 वर्षे झाली. 1962 पासून ते झोपूच शकले नाही आहेत. ते जागेच आहेत.

त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कधी झोपलेलं पाहिलंच नाही आहे. कदाचित एनजोक हे जगातील पहिलेच व्यक्ती असतील, ज्यांना झोप येत नाही. त्यांच्या झोप न येण्याचं कारण डाॅक्टरांनी निद्रानाश हा आजार (Insomnia) असल्याचं सांगितलं आहे. निद्रानाशामुळं शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होतात, मात्र एनजोक यांच्यावर या गोष्टीचा काहीच विपरित परिणाम झाल्याचं दिसत नाही.

ऐनजोक अगदी तंदुरुस्त आहेत. ते सकाळी फिरायला देखील जातात. त्यांना कोणताही आजार नाही. दरम्यान, इतकं सगळं असलं तरी झोप प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे थाय एनजोक यांनादेखील सामान्यलोकांप्रमाणे शांतपणे झोपावे अशी इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या