SBI Update | SBI चा ग्राहकांना मोठा झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | देशातील सगळ्यात मोठी बँक SBI ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने त्यांच्या कर्जाचा दर किंवा मार्जिनल काॅस्ट ऑफ लेंडिंग रेट वाढवला आहे. यानंतर ग्राहकांना कर्ज घेणं महाग पडू शकतं. बँकेच्या या निर्णयामुळं ग्राहकांना धक्का बसला आहे.

बँकेच्या कर्जातून अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करत असतात. बँकेच्या कर्जामुळं (Due to debt)अनेकदा आपल्याला प्रचंड मदत होते.आता मात्र SBI च्या या निर्णयामुळं अनेकांची निराशा होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईत आता कर्ज घेणंदेखील महाग झाल्यानं कर्जधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) रेपो रेट वाढवला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानं आता देशातील सर्वात मोठ्या बँकेनही कर्ज महाग करणाऱ्या यादीत प्रवेश केला आहे. 2022 मध्ये महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचवेळा रेपो दरात वाढ केली आहे.

SBI ने महिन्याच्या कर्जासाठी MCLR 8.00 टक्क्यांवरुन 8.10 टक्के. 3 महिन्यांसाठी 8.10 टक्के, 6 महिन्यांसाठी 8.30 टक्क्यांवरुन 8.40 टक्के केला आहे. एक वर्षाच्या कर्जाचा दर 8.40 टक्क्यांवरुन वाढला आहे. कर्ज बहुतेक एका वर्षाच्या MCLR शी जोडलेली असतात. नवीन दरांनुसार,बँकेने दोन वर्षांसाठी एमएलसीआर 8.50 टक्क्यांवरुन 8.60 केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या