“…म्हणून प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले”
मुंबई | 2014 ला देशात मोठं सत्तांतर करत भाजप सत्तेत आली. फक्त भाजप सत्तेत आली नाही तर काॅंग्रेसला मोठ्या राजकीय नुकसानीचा सामना करावा लागला. तेव्हापासून काॅंग्रेसला काही अंशी यश मिळालं असलं तरी बहूतांश निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच काॅंग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहात आहेत. प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या काॅंग्रेस प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
प्रशांत किशोर मध्यंतरी मला येऊन भेटले होते आमच्यात प्रदिर्घ चर्चा देखील झाली. काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबल्याचं त्यांनी मला सांगितलं. कारण त्यांच्या काही अटी होत्या आणि त्या पुर्ण होत नव्हत्या, असं चव्हाण म्हणाले आहेत. प्रशांत किशोर राजकीय रणनितिकार आहेत त्यांच्या कामाची एक वेगळी पद्धत आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.
प्रशांत किशोर यांच्या काॅंग्रेस प्रवेशाची प्रक्रिया परत सुरू झाली आहे पण त्यांच्या त्याच अटी आहेत. हुकुमशाही भाजपला रोखण्यासाठी काॅंग्रेस हा पर्याय आहे, मात्र त्यासाठी पक्षांतर्गत काही बदल सुचवले आहेत, असंही चव्हाण म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी प्रदिर्घ काळापासून राजकीय रणनितिकाराची यशस्वी भूमिका पार पाडली आहे.
दरम्यान, काॅंग्रेस पक्षात विविध बदल करण्यासाठी काही समित्या बनवण्यात आल्या आहेत. तर प्रशांत किशोर यांचं प्रकरण राजकीय समितीन हाताळत आहे. प्रशांत किशोर आणि काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सध्यात बैठकी चालू आहेत.
थोडक्यात बातम्या –
सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्याला अटक
मुंबई उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला झाप झाप झापलं!
“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”
“माझे शब्द लिहून ठेवा, एक दिवस ऊसामुळं आत्महत्येची वेळ येईल”
‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप
Comments are closed.