Loading...

ऐकावं ते नवलच, एका मांजरीनं कर्णधाराला केलं संघाबाहेर!

सिडणी | क्रिकेटच्या मैदानात नेहमीच काहीतरी अजब प्रकार घडत असतात. मात्र एका प्राण्यामुळं संघातील खेळाडू संघाबाहेर गेला असेल, असा प्रकार कधीच घडला नसेल. मात्र क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ‘बीग बॅश लीग’मध्ये हा प्रकार घडला आहे. या लीगमध्ये सिडनी थंडर संघाची कर्णधार रेचेल हेंसजवळ असलेली एका पाळीव मांजरीमुळे तिला संघाबाहेर जावं लागलं. रेचेलची मांजर तिलाच चावली, त्यामुळं तिच्या पायाला इनफेक्शन झालंय. ज्यामुळं रेचेलला संघातून माघार घ्यावी लागली. या सगळ्याचा फटका सिडनी थंडर या संघाला बसलाय. रेचेल खेळू न शकल्यामुळे संघाला पराभव सहन करावा लागला आहे.

Loading...

रेचेल आपली पाळीव मांजर आणि एका जंगली प्राण्यामध्ये झालेले भांडण सोडवत होती. तेव्हा रेचेलच्या मांजरीनं तिच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळं तिला इनफेक्शन झालं आहे, असं सिडणी थंडरची गोलंदाज हना हार्लिंगटननं सांगितलं आहे.

बीग बॅश लीगमधला हा पहिला प्रकार आहे. 2018मध्ये ऑस्ट्रेलियाचा डीआर्सी शॉर्टसोबतही असाच प्रकार घडला होता. शॉर्टवर त्याच्या पाळीव कुत्र्यांनं हल्ला केला होता. त्यानंतर त्यालाही एका सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...