नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत आणि गांधी घराण्याशिवाय दुसरा अध्यक्ष काँग्रेसला मिळणार आहे, अशा चर्चांना जोर चढला होता. मात्र काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राहुल गांधींच काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. माध्यमांत होत असल्याच्या चर्चेत कुठलंही तथ्य नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा चुकीची आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत बदलाचा भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटेनी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती, असं वृत्त ‘रिपब्लिक टीव्ही’ने दिलं होतं. मात्र या सगळ्या चर्चांना आता रणदीप सुरजेवाला यांनी पूर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-मोदींच्या शपथविधीला महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण; पण ‘या’ नेत्याला निमंत्रण नाही
-राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून या बड्या नेत्याचं नाव चर्चेत??
-राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात भेटणार ‘या’ भाजप नेत्याला! मुहूर्त ठरला??
-अखेर लालूप्रसाद यादवांनी जेवणं घ्यायला केली सुरूवात!
-अजित पवार आणि वळसे पाटलांचा प्रचारात किती वाटा होता?? डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…
Comments are closed.